एसटी महामंडळात मोठी भरती, 10 पास ते पदवीधरांना नोकरीची संधी

एसटी महामंडळात मोठी भरती, 10 पास ते पदवीधरांना नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य सरकारवर कर्जाचा बोजा वाढल्याने सध्या अनेक विभागांतील पदभरती प्रक्रियांना ब्रेक लागलेला असतानाही, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मात्र भरतीची नवी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची व महत्वाची संधी आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

एसटी महामंडळात ३६७ प्रशिक्षणार्थी पदांची भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयामार्फत नुकतीच विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे.

एकूण ३६७ रिक्त पदांवर भरती होणार असून, यात अभियांत्रिकी पदवीधर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक), पेंटर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर आणि कारपेंटर यांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १४ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर, अर्जाचा नमुना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात (एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक) उपलब्ध असून, तो भरून ऑफलाइन पद्धतीने कार्यालयात सादर करायचा आहे.

एमपीएससीकडून गट ब अराजपत्रित सेवेअंतर्गत २८२ पदांची भरती

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून एकूण २८२ पदांसाठी भरतीची प्रक्रिया जाहीर केली आहे. ही पूर्वपरीक्षा येत्या ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

या अंतर्गत राज्य कर निरीक्षक पदासाठी २७९, तर सहायक कक्ष अधिकारी पदासाठी ३ जागा राखीव आहेत. इच्छुक उमेदवार १ ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. तसेच, चालानाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२५ आहे.

संयुक्त पूर्वपरीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलावले जाणार आहे. मुख्य परीक्षेची तारीख नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment