सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, २४ कॅरेट सोन्याचा भाव किती? पाहा लेटेस्ट दर
Latest Gold Rates
रक्षाबंधनानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. गोपाळष्टमीच्या दिवशीदेखील सोन्याच्या भावात घसरण झाली असून ग्राहकांना दिलासा मिळत आहे. मात्र, चांदीच्या दरात मात्र तेजी पाहायला मिळत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
२४ कॅरेट सोनं
गोपाळष्टमीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचा दर ६०० रुपयांनी स्वस्त झाला आहे. १ तोळं २४ कॅरेट सोनं आता १,०१,१८० रुपये इतक्या दराने मिळत आहे. तर १० तोळं सोन्याचा दर १०,११,८०० रुपये इतका आहे.
२२ कॅरेट सोनं
२२ कॅरेट सोन्यातही घसरण झाली आहे. १ तोळं २२ कॅरेट सोनं ५० रुपयांनी स्वस्त झाले असून त्याचा दर ९२,७५० रुपये झाला आहे. १० तोळं सोनं खरेदीसाठी ग्राहकांना ९,२७,५०० रुपये मोजावे लागतील.
१८ कॅरेट सोनं
१८ कॅरेट सोन्यातही घसरण पाहायला मिळाली आहे. १ तोळं सोनं ४० रुपयांनी स्वस्त झाले असून त्याचा दर ७५,८९० रुपये झाला आहे. तर १०० ग्रॅम सोन्यासाठी ७,५८,९०० रुपये मोजावे लागतील.
चांदीचे दर
सोनं स्वस्त होत असताना चांदी मात्र महागली आहे. १ किलो चांदीचा दर तब्बल १,१६,२०० रुपये झाला असून १ ग्रॅम चांदी ११६ रुपयांनी महागली आहे.
सोन्याच्या दरात झालेली घसरण ही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी असली तरी, चांदी खरेदी करणाऱ्यांना आता जास्त खर्च करावा लागणार आहे.