लाडकी बहीण योजनेतील या 84 हजार महिला होणार अपात्र, १५०० रुपये मिळणार नाहीत

लाडकी बहीण योजनेतील या 84 हजार महिला होणार अपात्र, १५०० रुपये मिळणार नाहीत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजनेतील ८४ हजार महिलांचा हप्ता थांबण्याची शक्यता

नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठी पडताळणी मोहीम सुरू झाली आहे. या योजनेतून दरमहा ₹1500 मदत मिळणाऱ्या तब्बल 84 हजार महिलांचे अर्ज संशयित यादीत टाकून तपासणीसाठी पाठवले गेले आहेत.

अधिक माहिती येथे पहा

नियम मोडून केलेले अर्ज उघडकीस

तपासणीत असे समोर आले आहे की, काही कुटुंबांमध्ये 3-4 महिलांनी एकाच वेळी अर्ज केले आहेत, तर काहींनी वयोमर्यादा पूर्ण न करता चुकीची माहिती दिली आहे. योजनेच्या नियमांनुसार वय किमान 21 वर्षे असणे आवश्यक आहे, मात्र अनेकांनी वय 21 वर्षांपेक्षा कमी असूनही अर्ज केला आहे. याशिवाय उत्पन्न मर्यादा ओलांडून, सरकारी नोकरी असतानाही किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असतानाही अर्ज केलेले प्रकरणे आढळली आहेत. अशा सर्व प्रकरणांवर “FSC Multiple in Family” अशी नोंद केली जात आहे.

लाभार्थ्यांची संख्या आणि संशयित प्रकरणे

नागपूर जिल्ह्यात एकूण 5,19,267 महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यापैकी 84 हजार अर्ज संशयित यादीत असून, हजारो अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. सध्या अधिकारी आणि अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन पडताळणी करत आहेत.

खोटे अर्ज रोखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

या कारवाईचा मुख्य उद्देश म्हणजे खोटे व अपात्र अर्ज वगळून खरी गरजूंना लाभ मिळवून देणे हा आहे. जर तुमचा अर्ज सर्व नियमांनुसार असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. मात्र कुटुंबातील इतर सदस्यांनी अर्ज केला आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. अपात्र असल्यास स्वतःहून अर्ज मागे घ्यावा, अन्यथा आतापर्यंत मिळालेली रक्कम सरकार परत मागवू शकते.

इतर जिल्ह्यांमध्येही पडताळणीची शक्यता
लाडकी बहीण योजना ही अनेक गरजू महिलांसाठी मोठा आधार आहे. तिचा गैरवापर टाळण्यासाठी नागपूरनंतर राज्यातील इतर जिल्ह्यांतही अशाच प्रकारची तपासणी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment