मोठी बातमी : लाडक्या बहिणींसाठी अजितदादांची महत्त्वपूर्ण घोषणा; व्यवसायासाठी ४० हजारांपर्यंत कर्ज मिळणार

Ladki Bahin Loan Yojana 2025 : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा विचार सरकार करत आहे.

नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, “लाडक्या बहिणींना आम्ही दर महिन्याला १५०० रुपये देतो. ही योजना चालूच राहणार असून लाभार्थी महिलांना याचा फायदा होत आहे. योजनेच्या पुढील टप्प्यात महिलांना व्यवसाय उभारणीसाठी भांडवल स्वरूपात कर्ज देण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे.”

ते पुढे म्हणाले, “राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती बँकांशी चर्चा सुरु आहे. महिलांना एकरकमी ३० ते ४० हजार रुपये कर्ज मिळेल आणि त्या कर्जाचे हप्ते दर महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या सहाय्यातून कापले जातील. त्यामुळे महिलांना वेगळा आर्थिक भार पडणार नाही. या कर्जाच्या सहाय्याने महिला छोटा व्यवसाय सुरु करू शकतील आणि त्यातून त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक सबलीकरण होईल.”

अजित पवार यांनी स्पष्ट केले की, “राज्यातील काही महिलांनी आधीच असे उपक्रम राबवले आहेत आणि त्यातून यशही मिळवले आहे. त्यामुळे इतर महिलांनीही या संधीचा विचार करावा आणि पुढाकार घ्यावा. सरकार लवकरच हा कार्यक्रम सुरु करणार असून महिलांनी त्याचा फायदा घ्यावा.”

ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment