सरकारी नोकरी : पहारेकरी, शिपाई चतुर्थश्रेणी सेवक, आया, कक्षसेवक व इतर गट ‘ड’ पदांची भरती पगार रु. १५०००/- ते ४७६००/-
गट-ड (वर्ग 4) संवर्गातील विविध पदांच्या 354 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत ही भरती होणार असून, पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदांची माहिती
गट-ड संवर्गातील विविध पदांमध्ये खालील पदांचा समावेश आहे – गॅस प्लांट ऑपरेटर (1), भंडार सेवक (1), प्रयोगशाळा परिचर (1), दवाखाना सेवक (4), संदेश वाहक (2), बटलर (4), माळी (3), प्रयोगशाळा सेवक (8), स्वयंपाकी सेवक (8), नाभिक (8), सहाय्यक स्वयंपाकी (9), हमाल (13), रुग्णपट वाहक (10), क्ष-किरण सेवक (15), शिपाई (2), पहारेकरी (23), चतुर्थ श्रेणी सेवक (36), आया (38) आणि कक्षसेवक (168). अशा प्रकारे एकूण 354 पदांची भरती होणार आहे.
PDF जाहिरात येथे पहा
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सादर करण्याची सुरुवात : 15 ऑगस्ट 2025
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत
- परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत
अर्जाची पद्धत व माहिती
उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी व भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती https://bjgmcpune.com या अधिकृत संकेतस्थळावर पाहावी. परीक्षेचा दिनांक व वेळ उमेदवारांच्या प्रवेशपत्रावरून जाहीर करण्यात येईल.
इतर अटी
भरती प्रक्रियेत पदसंख्या, आरक्षण तसेच इतर अटींमध्ये बदल करण्याचा, तसेच भरती प्रक्रिया स्थगित अथवा रद्द करण्याचा अधिकार रुग्णालय प्रशासनाकडे राखून ठेवण्यात आला आहे.