सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पगारात होणार इतकी वाढ!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पगारात होणार इतकी वाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिवाळीपूर्वी केंद्र सरकार लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी देऊ शकते. जुलै ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी महागाई भत्ता (DA) ३% नी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या डीए ५५% असून, तो वाढून ५८% होण्याचा अंदाज आहे.

डीए वाढल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये थेट वाढ होईल. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ₹40,000 असेल, तर सध्या ५५% डीए नुसार त्याला ₹22,000 महागाई भत्ता मिळतो. डीए ५८% झाल्यानंतर ही रक्कम ₹23,200 इतकी होईल. म्हणजेच कर्मचाऱ्याच्या पगारात दरमहा ₹1,200 ची वाढ होईल.

येथे पहा सविस्तर माहिती

फक्त एवढेच नाही, तर डीए वाढीचा परिणाम प्रवास भत्ता (TA), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर भत्त्यांवरही होतो. त्यामुळे एकूण पगारात आणखी वाढ होते.

महागाई भत्ता वाढवण्याचा आधार ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) असतो. नुकताच कामगार ब्युरोने जून २०२५ साठीचा CPI-IW डेटा जाहीर केला आहे, जो १ अंकाने वाढून १४५ झाला आहे. या आकडेवारीनुसार, यावेळी डीए मध्ये ३% वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.

Leave a Comment