महाराष्ट्रात एकूण 14,114 पोलिस कॉन्स्टेबल पदांची भरती, येथे पहा डिटेल्स

महाराष्ट्रात एकूण 14,114 पोलिस कॉन्स्टेबल पदांची भरती, येथे पहा डिटेल्स

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र गृह विभागाने राज्यातील पोलिस शिपाई संवर्गातील तब्बल 14,114 रिक्त पदे भरण्याला मंजुरी दिली आहे. या मोठ्या प्रमाणावरच्या भरतीसंदर्भातील निर्णय दिनांक 29 जुलै 2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस शिपाई तसेच कारागृह विभागातील करागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये एकूण 14,114 पदांचा समावेश असून, वित्त विभागाच्या दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून शिथिलता देऊन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

येथे पहा जाहिरात

भरती होणाऱ्या पदांची विभागवार आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे :

  • पोलिस शिपाई – 10,908 पदे
  • पोलिस शिपाई चालक – 234 पदे
  • बॅण्डरमन – 25 पदे
  • सशस्त्र पोलिस शिपाई – 2,393 पदे
  • कारागृह शिपाई – 554 पदे
    👉 एकूण – 14,114 पदे

ही पदे 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त असलेली तसेच 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे या दोन्हींचा समावेश करून भरण्यात येणार आहेत.

तसेच, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 04 मे 2022 व 21 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून शिथिलता देऊन, ही भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांची निवड ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेऊन केली जाणार आहे.

Leave a Comment