सोन्याचे आजचे भाव | सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण : Aajcha Sonyacha Bhav
भारतातील सोन्याचा दर दररोज बदलत असतो. विशेष म्हणजे लाखो लोकांमध्ये सोन्याचा आजचा दर पाहाण्याची मोठी उत्सुकता असते. भारतात विशिष्ट मुहुर्तावर सोने खरेदीला महत्त्व आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे ताजे दर पाहिले जातात. भारतातील अनेक शहरांत सोन्याच्या दरात किरकोळ फरक दिसून येतो
भारतात सोन्याचा आजचा दर :
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे,
सोने एक हजार रुपये तर चांदी 2 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. सणासुदीत सोनं स्वस्त झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जागतिक बाजारात विक्रीचा जोरदार मारा झाल्यामुळे सोन्याला फटका बसला असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.
1 हजार रुपयांच्या घसरणीसह सोने प्रतितोळा 101520 रुपयांवर आलं आहे..
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा दर जाणून घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार दिसून येतो.
तसेच सोन्याच्या दरासाठी स्थानिक राजकीय घडामोडी, सण-उत्सव, आंतरराष्ट्रीय बाजार आणि कमोडिटी क्षेत्रातील अस्थिरता, पुरवठा-मागणी अशा अनेक मुद्दे कारणीभूत ठरू शकतात.
भारतात सोन्याचे दर दररोज बदलतात…
भारतात सोन्याचे दर कॅरेटनुसार ठरवले जातात. त्यात 18, 22, आणि 24 कॅरेटचा समावेश असतो. सोन्याचे दर प्रथम यूएस डॉलरमध्ये ठरवले जातात. त्यानंतर त्याचे रुपांतर भारतीय रुपयांमध्ये केले जाते. भारतात दररोज सोन्याच्या दरात बदल होत असतो.
भारतातील सोन्याच्या दरावर परिणाम करणारे विविध कर कोणते:
प्र.१: भारतात किती सोनं बाळगण्याची परवानगी आहे?
उ. – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) नियमानुसार, विवाहित महिलांना 500 ग्रॅम, अविवाहित महिलांना 250 ग्रॅम आणि पुरुषांना 100 ग्रॅम सोनं बाळगण्याची मुभा आहे.
प्र.२: भारत विदेशातून सोनं आयात करतो का?
उ. – होय. भारतात सोन्याची मागणी प्रचंड असल्याने, देश विदेशातून मोठ्या प्रमाणात सोनं आयात करतो.
प्र.३: जागतिक क्रमवारीत सोन्याच्या वापरामध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे?
उ. – सोन्याच्या वापरामध्ये भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे.
प्र.४: दागिन्यांपेक्षा गोल्ड बॉण्ड्समध्ये गुंतवणूक फायदेशीर आहे का?
उ. – होय. गोल्ड बॉण्ड्समध्ये चोरीची जोखीम नसते आणि त्यावर वार्षिक व्याज मिळते, त्यामुळे ते सुरक्षित व फायदेशीर गुंतवणूक मानली जाते.
प्र.५: गोल्ड बॉण्ड्स कुठे खरेदी करता येतात?
उ. – गोल्ड बॉण्ड्स बँक, पोस्ट ऑफिस किंवा डिमॅट अकाउंटद्वारे ऑनलाइन खरेदी करता येतात.
प्र.६: सोनं खरेदी करताना किती कर भरावा लागतो?
उ. – सध्या सोन्यावरील एकूण कर 20.8% आहे. मात्र हा दर अल्पकालीन भांडवली नफ्यावर लागू होत नाही.
प्र.७: कोणते सोने शुद्ध मानले जाते?
उ. – 24K सोने हे 100% शुद्ध मानले जाते, परंतु ते मऊ असल्याने दागिन्यांसाठी कमी वापरले जाते.
प्र.८: रोजच्या वापरासाठी कोणते सोने योग्य आहे?
उ. – 22K सोने (T916) रोजच्या वापरासाठी सर्वात योग्य आहे, कारण त्यात इतर धातूंचे मिश्रण असल्यामुळे ते अधिक टिकाऊ असते.
प्र.९: सोन्याचे कोणते रंग उपलब्ध आहेत?
उ. – पिवळे सोने, पांढरे सोने आणि गुलाबी सोने हे तीन प्रमुख रंग बाजारात उपलब्ध आहेत.
प्र.१०: गुलाबी सोने स्वस्त का असते?
उ. – गुलाबी सोन्यात तांबे जास्त प्रमाणात असल्यामुळे ते पिवळ्या सोन्यापेक्षा स्वस्त असते.
प्र.११: KDM म्हणजे काय?
उ. – KDM म्हणजे “कॅडमियम”, जी सोन्याच्या दागिन्यांच्या निर्मितीतील एक पद्धत आहे.
प्र.१२: सोन्याची शुद्धता कशी तपासली जाते?
उ. – दगडावर घासून नायट्रिक अॅसिड टाकल्यावर जर चिन्ह गायब झाले तर सोने शुद्ध असल्याचे समजते.