‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर काष्ठी साडीत तरुणीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर काष्ठी साडीत तरुणीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: सोशल मीडियाआधीचे आणि सोशल मीडियानंतरचे जग यात प्रचंड बदल झाला आहे. आजची पिढी सोशल मीडियामध्ये इतकी रमली आहे की, दिवसातील मोठा वेळ यावरच खर्च होतो. सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन आणि आकर्षक कंटेंट पाहायला मिळतो, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भुरळ घालतो. याच माध्यमातून अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि त्यातून ते लोकप्रियतेसोबतच आर्थिक उत्पन्नही कमवू लागले आहेत.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मीडियावर कधी नृत्य, कधी गाणी, तर कधी अभिनय अशा विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. काही कलाकार केवळ प्रसिद्धीसाठी अश्लील नृत्य करतात, तर काहीजण भारतीय संस्कृतीचा ठसा उमटवत आपली कला सादर करतात. सध्या अशाच एका संस्कृतीला जपत केलेल्या सादरीकरणाचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चर्चेत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी पारंपरिक काष्ठी साडी नेसून, डोंगराळ परिसरात ‘वादळ वारा सुटला गं’ या जुन्या मराठी गाण्यावर अप्रतिम नृत्य करताना दिसते. तिच्या डान्स स्टेप्ससोबतच चेहऱ्यावरील मोहक हावभावांनाही नेटकरी भरभरून दाद देत आहेत. तिच्या सादरीकरणामुळे केवळ मराठी संस्कृतीचं सौंदर्यच नाही, तर पारंपरिक वेशभूषेचीही झलक पुन्हा एकदा समोर आली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Comment