अमेरिकेचा प्रभाव! पुढील 7 दिवसांत सोनं-चांदी कुठे पोहोचेल? तज्ज्ञांचा थेट अंदाज पहा
अमेरिकेमुळे सोन्या-चांदीवर मोठा दबाव निर्माण झाला असून पुढील ७ दिवसांमध्ये दरात चढ-उतार दिसू शकतात. तज्ज्ञांचे मत आहे की, सध्या सोनं खरेदी करण्याची घाई करू नये, कारण दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या महागाई आकड्यांवर जागतिक बाजारपेठेचे लक्ष केंद्रित आहे. सोन्याचा दर सध्या ३,४४१.३० डॉलर प्रति औंस आहे आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात त्यात वाढ होऊ शकते.
सध्या जागतिक बाजारपेठेत टॅरिफ वादामुळे तणावाचे वातावरण आहे. या परिणामामुळे शेअर मार्केटप्रमाणेच सोन्या-चांदीच्या दरांवरही दबाव दिसून येत आहे. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी या आठवड्यातील दरांचा कल पाहणे फायदेशीर ठरेल. फेड रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरांच्या निर्णयावर सोन्या-चांदीच्या भावावर मोठा परिणाम होणार आहे.
COMEX वर सध्या सोनं १.४ टक्क्यांनी स्वस्त होऊन ३,४४१.३० डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे, तर चांदीचे दर ०.८४ टक्क्यांनी घसरून ३८.२२ डॉलर प्रति औंसवर आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, मॅक्रो इकॉनॉमिक अनिश्चितता, टॅरिफ वाद आणि मध्यवर्ती बँकांची खरेदी यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे वाढता कल दिसून येईल आणि दर वाढण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदार या आठवड्यात जाहीर होणाऱ्या महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीवर लक्ष ठेवतील. यात यूके आणि ईयू जीडीपी, तसेच यूएस कोर पीपीआय आणि कोर सीपीआय डेटा यांचा समावेश आहे. एंजल वनचे उपाध्यक्ष (संशोधन, बिगर-कृषी वस्तू आणि चलन विभाग) प्रथमेश मल्ल्या यांच्या मते, सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये नव्या उंचीवर जाऊ शकतात.
२८ जुलै रोजी प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ९८,०७९ रुपयांच्या नीचांकी पातळीवरून १,०४,२५० रुपयांच्या सर्वोच्च पातळीपर्यंत गेला. गौरी-गणपतीसाठी विशेष सोनं खरेदी केली जाते, परंतु यंदा या खरेदीत घट येण्याची शक्यता आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, ८ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,०४,९४२ रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर चांदीचा भाव १,१४,७३२ रुपये प्रति किलो होता.
शनिवार आणि रविवार बाजार बंद असल्याने दरात कोणताही बदल झाला नाही. सध्या १ तोळे सोनं १,०३,००० रुपयांवर पोहोचले आहे, तर रिटेल मार्केटमध्ये हा दर ९९,५६९ रुपये आहे. चांदीचे दर प्रति किलो १,१६,००० रुपये असून GST सह १,१७,००० रुपये आहेत. तज्ज्ञांच्या मते, या आठवड्यात दर आणखी वाढू शकतात, त्यामुळे खरेदीसाठी थोडा वेळ थांबणे आणि विक्रीची घाई न करणे योग्य ठरेल.