13 ऑगस्टला राज्यावर मोठं संकट, महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, थेट अलर्ट Maharashtra Rain Update Today
Maharashtra Rain Update Today : मागील काही दिवसांपासून पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता नुकताच मोठा इशारा हा देण्यात आलाय. यामुळे नागरिकांनी शक्यतो महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणेही टाळावे. दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात मॉन्सून लवकर दाखल झालाय.
मागील काही दिवसांपासून पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता हवामान विभागाकडून मोठा इशारा हा देण्यात आलाय. बुधवारी जोरदार पाऊस होणार आहे. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात तसेत राज्यातील काही भागात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार आहे.
या आठवड्यात बुधवार 13 ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ, तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
14 ऑगस्टला रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात 13 आणि 14 ऑगस्टला गडचिरोली आणि यवतमाळमध्ये ऑरेंज ॲलर्टही देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने 13 ऑगस्टला अलर्ट जारी केला आहे. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
13 ऑगस्टला मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
देशातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळतंय. दरवर्षीपेक्षा यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर झाले आहे. राजस्थान, दिल्ली आणि बिहारमध्ये जोरदार पाऊस होताना दिसतोय. उत्तर बिहारमधील सीतामढी, शिवहार, पूर्णिया आणि कटिहारपर्यंत एकूण 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे बिहारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासोबतच सीतामढी, शिवहर, दरभंगा, मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज येथेही पाऊस झालाय.
बिहार, दिल्ली आणि राजस्थानमध्ये जोरदार पाऊस
राजस्थानच्या अनेक जिल्हात जोरदार देखील पाऊस होताना दिसतोय. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस म्हणावा तसा झाला नाही. आता परत एकदा भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस नसल्याने पिके संकटात आली असून बळीराजा चिंतेत असल्याचे बघायला मिळत आहे. काही भागांमध्ये अजूनही समाधानकारण पाऊस झाला नाहीये