8th Pay Commission : 8 व्या वेतन आयोगात बेसिक पगार ₹18000/- वरून थेट ₹32000/- तुमचा बेसिक पगार येथे पहा
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. या रिपोर्टनुसार, 8व्या वेतन आयोगात पगारात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही.
किती वाढ होणार पगारात?
‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’ने तयार केलेल्या अहवालानुसार, यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात केवळ 13 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगात ही वाढ 14.3 टक्के होती, त्यामुळे यावेळेस थोडीशी कमी वाढ होईल, असा अंदाज आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
फिटमेंट फॅक्टर किती राहणार?
या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.8 असू शकतो, असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. मागील वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 होता. फिटमेंट फॅक्टर म्हणजे मूळ वेतनात किती गुणाकार करून नवीन वेतन ठरवलं जाईल, याचा आधार. त्यामुळे यावेळी मूळ वेतनात फारसा मोठा फरक पडणार नाही.
उदाहरणाने समजून घ्या –
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा बेसिक पगार ₹18,000 आहे, तर 1.8 फिटमेंट फॅक्टरनुसार तो वाढून ₹32,000 इतका होईल. जर यावर 55% महागाई भत्ता (DA) लागू केला, तर एकूण पगार सुमारे ₹49,600 पर्यंत जाईल.
याचप्रमाणे, ज्यांचा मूळ पगार ₹50,000 आहे, त्यांचा पगार वाढून ₹90,000 पर्यंत होऊ शकतो. यातही DA वेगळा मिळेल.
8वा वेतन आयोग कधी लागू होईल?
सरकारने 8व्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी 2025 मध्ये केली होती. मात्र हा वेतन आयोग प्रत्यक्षात जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. त्यानंतर जेव्हा हे सुधारित वेतन लागू होईल, तेव्हा मागील महिन्यांचा फरकही पगारात दिला जाईल.
वेतन आयोग किती वर्षांनी लागू होतो?
साधारणपणे दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. याआधी 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता.
8वा वेतन आयोग 2026 पासून लागू होणार असून यामध्ये पगारात फारशी मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. सध्याच्या अंदाजानुसार केवळ 13% पगारवाढ होईल आणि फिटमेंट फॅक्टर 1.8 इतका राहू शकतो.